Corrupt leaders feast at a city gate while humble families share bread and look toward Zion

स्तोत्रसंहिता 53

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 53 भ्रष्ट वर्तन, सार्वत्रिक अपयश आणि असहायांच्या शोषणाद्वारे व्यावहारिक नास्तिकतेचे वर्णन करतो. तरीही अन्यायी सत्तेवर घबराट येते, आणि दुःख सहन करणारा समाज सियोनहून येणाऱ्या पुनर्स्थापनेची तळमळ चालू ठेवतो.
मूर्खपणाभ्रष्टाचारगरीबपुनर्स्थापना
1मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर अस्तित्वात नाही.” ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी, कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.
2मानवांमध्ये कोणी समंजस आहे का परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतात.
3प्रत्येकजण भटकून गेलेला आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.
4दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून टाकतील. ते कधीही परमेश्वराला हाक मारत नाहीत.
5पण पाहा, जिथे भिण्याचे कारण नव्हते, तिथे ते भयाने भरले. परमेश्वराने त्यांची हाडे विखरून टाकली, ज्यांनी तुमच्याविरुद्ध तळ दिला होता; तुम्ही त्यांची फजिती केली, कारण ते परमेश्वराद्वारे लज्जित झाले आहेत.
6अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा परमेश्वर त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.