
स्तोत्रसंहिता 1
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 1 देवाच्या शिकवणीत रुजलेल्यांची तुलना भुशासारख्या उडून जाणाऱ्यांशी करते. मनन, शहाणी सोबत, आणि फलदायी जीवन नीतिमानांच्या मार्गाला चिन्हांकित करतात, तर दुष्टांचा मार्ग टिकू शकत नाही.
शहाणपणमनननीतिमत्तादोन मार्ग
1धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.
2पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.
3ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.
4परंतु दुष्ट तसे नाहीत. ते वार्याने उडून जाणार्या भुश्यासारखे आहेत.
5म्हणून दुष्ट न्यायसभेत, किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.
6कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.