
स्तोत्रसंहिता 54
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 54 तेव्हा उद्भवते जेव्हा अनोळखी लोक दावीदचे स्थान शत्रुत्वाच्या सत्तेला उघड करतात. संक्षिप्त प्रार्थना न्यायीकरण व सुटका मागते, निष्ठावान सोबत्यांद्वारे सांभाळणारी मदत ओळखते, आणि सुटकेनंतर स्वेच्छेने आभारप्रदर्शनाचे वचन देते.
विश्वासघातमदतसुटकाआभारप्रदर्शन
1परमेश्वरा, तुम्ही आपल्या नावाने माझे तारण करा; आपल्या सामर्थ्याने मला निर्दोष जाहीर करा.
2परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका. माझ्या मुखातील शब्दांकडे कान द्या.
3कारण परकी माणसे माझ्याविरुद्ध उठली आहेत; परमेश्वराचा आदर न करणारे निर्दयी लोक— माझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सेला
4परंतु परमेश्वर निश्चितच माझे साहाय्यकर्ता आहेत; परमेश्वरच आहेत, जे मला मदत करतात.
5माझ्या शत्रूंच्या दुष्ट कृत्त्यांचा मोबदला त्यांना मिळो; परमेश्वरा, तुम्ही आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश करा.
6मी स्वेच्छेने माझे यज्ञ तुम्हाला अर्पण करणार; याहवेह, तुमच्या नावाची महिमा मी गाईन, कारण तुमचे नाव उत्तम आहे.
7तुम्ही मला माझ्या सर्व संकटातून सोडविले आहे, आणि माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पहिला आहे.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.