
स्तोत्रसंहिता 52
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 52 हानी, फसवणूक आणि चोरलेल्या सुरक्षिततेचा अभिमान बाळगणाऱ्या शक्तिशाली माहितीदाराला सामोरे जातो. विनाशकारी भाषण टिकणार नाही, तर विश्वासू व्यक्ती स्थिर विश्वास व कृतज्ञ सार्वजनिक साक्षीद्वारे जैतुनाच्या झाडासारखी वाढते.
कपटविश्वासन्यायआभारप्रदर्शन
1हे बलवान पुरुषा, दुष्ट कृत्यांची बढाई का मारतोस, तू दिवसभर कशाचा अभिमान बाळगतोस, तू जो परमेश्वराच्या दृष्टीने निंदनीय आहेस?
2तू जो फसव्या कृतीत गुंतलेला आहे, दिवसभर तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्यासारखी विनाशाची योजना करीत असते.
3तुला चांगल्यापेक्षा दुष्टपणा, सत्य बोलण्यापेक्षा असत्य अधिक प्रिय आहे. सेला
4अगे कपटी जिभे, अपायकारक बोलणे तुला प्रिय आहे!
5परंतु परमेश्वर तुला शाश्वत विनाशाकडे आणतील; तुझ्या डेर्यातून तुला ओढून बाहेर काढतील आणि जिवंतांच्या भूमीतून समूळ नष्ट करून तुला दूर नेतील. सेला
6नीतिमान लोक भयचकित होऊन पाहतील; ते त्याला हसतील व म्हणतील:
7“पाहा, हा असा मनुष्य आहे ज्याने परमेश्वराला आपले आश्रयस्थान बनविले नाही तर आपल्या विपुल संपत्तीवर विश्वास ठेवला आणि दुसर्यांचा नाश करून तो बलवान झाला!”
8परंतु मी तर परमेश्वराच्या आश्रयाखालील जैतून वृक्षाप्रमाणे सुरक्षित आहे; परमेश्वराच्या अक्षय प्रीतिवर मी सदासर्वकाळ विसंबून आहे.
9कारण तुम्ही जे काही केले त्याबद्दल तुमच्या विश्वासू लोकांसमक्ष मी सदासर्वकाळ तुमची स्तुती करेन. आणि मी तुमच्या नावाची आशा करेन, कारण तुमचे नाव चांगले आहे.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.