A hunted man prays inside a cave as pursuers pass and friends approach along a sunlit path

स्तोत्रसंहिता 142

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 142 एकाकीपण, धोका आणि स्पष्ट त्यागातून प्रामाणिक तक्रार ओतते. कोणताही मानवी आश्रय दिसत नसताना, गुहेतील प्रार्थना देवाला वाटा म्हणून नाव देते आणि कृतज्ञ समाजात सुटकेची अपेक्षा करते.
एकाकीपणआश्रयतक्रारसुटका
1मी अगदी काकुळतीला येऊन याहवेहला विनवणी करतो; मी उच्चस्वरात याहवेहला दयेची विनंती करतो.
2माझी तक्रार मी त्यांच्यापुढे ओतत आहे, आणि माझे कष्ट मी त्यांच्यासमोर प्रकट करत आहे.
3कारण माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे, तुमच्यासमोर माझी नियती नेहमी स्पष्ट असते. माझ्या शत्रूंनी माझ्या मार्गात सापळे लावले आहेत.
4ते पाहा! माझ्या उजवीकडे मला साहाय्य करणारा कोणीही नाही; माझी कोणालाही पर्वा नाही. मला काहीच आश्रय नाही; माझ्या जिवाची कोणासही चिंता नाही.
5मी याहवेहचा धावा करतो; मी म्हटले, “तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात, जिवंतांच्या भूमीत तुम्हीच माझे विधिलिखित आहात.”
6माझा धावा ऐका, कारण मी अत्यंत निराशाजनक मनःस्थितीत आहे; माझा छळ करणार्‍यांपासून तुम्ही मला मुक्त करा, कारण ते माझ्यापेक्षा अत्यंत बलिष्ठ आहेत.
7मला बंदिवासातून मुक्त करा, म्हणजे मला तुमची उपकारस्तुती करता येईल; मग तुम्ही मला साहाय्य केले, म्हणून नीतिमान लोक माझ्याबरोबर आनंदोत्सव करतील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.