
स्तोत्रसंहिता 14
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 14 व्यावहारिक भ्रष्टाचाराला मूर्खपणा म्हणतो कारण ते आचरणाद्वारे जबाबदारी नाकारते. व्यापक चुकीच्या वर्तनामुळे गरिबांना हानी होते, तरी देव नीतिमानांसोबत उपस्थित असतो आणि त्यांचा आश्रय व वचन दिलेला सुटकाकर्ता राहतो.
मूर्खपणाभ्रष्टाचारगरीबआश्रय
1मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही.
2मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात.
3प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.
4दुष्कृत्य करणार्यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील. ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत.
5पण पाहा, ते तिथे भयाने भरले आहेत, कारण परमेश्वर नीतिमानांच्या पक्षाचे आहेत.
6दुष्कर्मे करणारे, तुम्ही गरिबांच्या योजना उधळून लावता, परंतु याहवेह त्यांचा आश्रय असतात.
7अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा याहवेह त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.