Pilgrims reconcile, reject bribery, and welcome neighbors below a sanctuary tent

स्तोत्रसंहिता 15

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 15 एकात्मिक चारित्र्याच्या चित्रणाद्वारे पवित्रतेजवळ कोण राहू शकतो याचे उत्तर देतो. सत्यवचन, शेजारधर्म, आर्थिक प्रामाणिकपणा, आणि दृढ वचने दैनंदिन नातेसंबंधांत व सार्वजनिक आचरणात उपासना दृश्यमान करतात.
प्रामाणिकपणाउपासनासत्यशेजारप्रेम
1याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?
2ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;
3जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्‍यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही;
4जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो, याहवेहचे भय धरणार्‍यांचा सन्मान करतो, आणि जो स्वतःचे नुकसान होत असले तरी दिलेले वचन पाळतो;
5जो व्याज न आकारता पैसे उसने देतो; जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही, जो कोणी या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.