A grieving man turns from moonlit sorrow toward dawn and approaching musicians

स्तोत्रसंहिता 13

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 13 विलापाच्या हालचालीला संक्षिप्त करतो: दीर्घकाळचा त्याग, तातडीची विनंती, नूतनीकृत विश्वास, आणि गीत. परिस्थिती गंभीर राहते, तरी आठवलेले विश्वासू प्रेम निराकरण पूर्णपणे दिसण्यापूर्वी स्तुतीला सक्षम करते.
विलापवाट पाहणेविश्वासस्तुती
1याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का? किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?
2मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे? कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे? कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे?
3याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या. या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल.
4माझे शत्रू म्हणतील “मी त्याला पराभूत केले आहे,” आणि माझ्या पतनाबद्दल ते आनंदित होतील.
5कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.
6मी याहवेहची स्तुती गाईन, कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.