
स्तोत्रसंहिता 12
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 12 फुशारकी मारणाऱ्या, खुशामत करणाऱ्या भाषणाला चांदीसारख्या शुद्ध केलेल्या वचनांशी विरोधाभास देते. फेरफाराच्या संस्कृतीत, असहाय मदतीसाठी ओरडतात आणि विश्वासार्ह शब्द रक्षणाचा चिरस्थायी स्रोत बनतात.
भाषणसत्यरक्षणगरीब
1याहवेह, साहाय्य करा, भक्तिमान नाहीसे होत आहेत; विश्वासयोग्य लोक आता मनुष्यांमध्ये राहिलेले नाहीत.
2प्रत्येकजण त्यांच्या शेजार्यांशी लबाड बोलतो, ते त्यांच्या ओठांनी खुशामत करतात परंतु त्यांच्या हृदयात कपट असते.
3खुशामत करणारे सर्व ओठ, आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको.
4ते बढाई मारतात आणि म्हणतात, “आम्ही आमच्या जिभेने प्रबल होऊ; आमचे ओठ आमचे संरक्षण करतील, आम्हावर धनी कोण?”
5याहवेह म्हणतात, “कारण गरिबांना लुटले आहे व गरजवंत कण्हत आहेत. म्हणून मी आता उठेन आणि त्यांची निंदा करणाऱ्यापासून त्यांना संरक्षण देईन.”
6शुद्ध केलेल्या चांदीप्रमाणे, सात वेळेस शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे, याहवेहची वचने शुद्ध आहेत.
7जेव्हा मनुष्याच्या दुष्टपणाचा आदर केला जातो, आणि दुष्ट सर्वत्र अहंकाराने फिरत असतात. याहवेह, तेव्हा तुम्हीच गरजवंताचे रक्षण करणार आणि तुम्हीच त्यांना या दुष्टापासून सुरक्षित ठेवाल.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.