A worshiper prays from deep stone steps while wall watchmen scan the horizon at sunrise

स्तोत्रसंहिता 130

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 130 गहन दोष व गरजेतून ओरडतो, तरी क्षमा निराशेऐवजी आदर निर्माण करते. वाट पाहणारा आत्मा पहारेकऱ्यांपेक्षा उत्सुकतेने सकाळची वाट पाहतो, स्थिर प्रेम व विपुल सामुदायिक खंडणीवर विश्वास ठेवत.
क्षमावाट पाहणेआशाखंडणी
1याहवेह, खोल ठिकाणातून मी तुमचा धावा करीत आहे;
2माझा धावा ऐका; प्रभू, माझ्या कृपेच्या विनंतीकडे तुमचे कान लागोत.
3याहवेह, तुम्ही आमच्या पापांचा हिशोब ठेवला, तर प्रभू आमच्यापैकी कोण उभा राहील?
4पण तुम्ही क्षमाशील आहात; म्हणूनच आम्ही अत्यंत आदराने तुमची सेवा करू शकतो.
5मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो, आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे.
6पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.
7हे इस्राएला, याहवेहची आशा धर, वात्सल्य याहवेहजवळच आहे; मनुष्यांचे संपूर्ण तारण त्यांच्याचकडेच आहे.
8ते स्वतः खंडणी भरून इस्राएलला सर्व पापांपासून मुक्त करतील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.