
स्तोत्रसंहिता 131
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 131 शांत अवलंबित्वासाठी अहंकार, भव्य महत्त्वाकांक्षा आणि अस्वस्थ इच्छा नाकारतो. वक्त्याचे आंतरिक जीवन आपल्या आईसोबत समाधानाने विसावणाऱ्या दूध सोडलेल्या मुलासारखे बनते, समाजाला चिरस्थायी आशेत आमंत्रित करत.
नम्रतासमाधानविश्वासआशा
1हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.
2दूध तुटलेले मूल जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते; दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय.
3हे इस्राएला, तू देखील शांतपणे, आता आणि सर्वदा, याहवेहवर आशा ठेव.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.