
स्तोत्रसंहिता 129
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 129 इस्राएलच्या तारुण्यापासूनच्या वारंवार जुलूमाला आठवतो पण त्याला अंतिम शब्द देत नाही. खोल जखमा दृश्यमान राहतात, पण बांधणारे दोर कापले जातात आणि शोषण करणारे छपराच्या उथळ गवतासारखे तात्पुरते बनतात.
जुलूमतग धरणेन्यायस्वातंत्र्य
1“माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,” इस्राएल म्हणो;
2“माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे, तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही.
3शेतकर्याने नांगरल्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली.
4परंतु याहवेह न्यायी आहेत; त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.”
5सीयोनाचा द्वेष करणारे सर्व लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत.
6घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत, जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते;
7कापणार्यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.
8येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत, “याहवेहचे आशीर्वाद तुम्हावर येवोत; आम्ही तुम्हाला याहवेहच्या नावाने आशीर्वाद देतो.”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.