
स्तोत्रसंहिता 128
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 128 अर्थपूर्ण श्रम, भरभराटीचा विवाह, जैतुनाच्या कोंबांसारखी मुले, दीर्घायुष्य, आणि यरुशलेमच्या शांतीद्वारे आशीर्वादाचे चित्रण करतो. खाजगी घरगुती आनंद नैसर्गिकरित्या संपूर्ण कराराच्या समाजाच्या काळजीत विस्तारतो.
कुटुंबश्रमआशीर्वादशांती
1जे याहवेहचे भय बाळगतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!
2तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील; तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.
3तुझी पत्नी तुझ्या घरात सफल द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
4होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांना हाच आशीर्वाद असणार.
5याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो; तुझे आयुष्यभर तू यरुशलेमची समृद्धी बघशील.
6नातवंडाचे सुख लाभेल इतके दीर्घ आयुष्य तुला मिळो— इस्राएलास शांती लाभो.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.