A family embraces children at a building site while workers and city watchmen pause to pray

स्तोत्रसंहिता 127

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 127 बांधण्यात, रक्षणात, कामात आणि कुटुंब वाढवण्यात चिंताग्रस्त स्वावलंबनाला आव्हान देतो. मानवी प्रयत्न महत्त्वाचा आहे, तरी चिरस्थायी सुरक्षितता व वारसा अस्वस्थ धडपडीतून निर्माण झालेल्या उपलब्धींऐवजी मिळालेल्या भेटी आहेत.
कुटुंबकाममुलेविश्वास
1याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.
2तुमचे पहाटे उठणे आणि रात्री उशीरापर्यंत अन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे— कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात.
3मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे, प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
4तरुणपणी झालेली मुले, शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
5ज्या पुरुषाचा भाता अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य! असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील, तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.