A tearful farmer sows near restored Jerusalem as joyful families return carrying abundant grain

स्तोत्रसंहिता 126

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 126 इतकी आश्चर्यकारक पुनर्स्थापना आठवते की ती स्वप्नासारखी वाटली. हास्य व आंतरराष्ट्रीय साक्ष परतीसोबत येतात, तर नूतनीकृत प्रार्थना विश्वास ठेवते की सध्याचे अश्रू व महागडी पेरणी गीत व विपुल कापणी बनतील.
पुनर्स्थापनाआनंदअश्रूकापणी
1जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले , तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.
2आमचे मुख हास्याने भरले होते आणि किती हर्षगीते आम्ही गाईली! तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली: “पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”
3याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत, आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.
4हे याहवेह, नेगेव नदीसारखी, आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या .
5जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.
6जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.