Jerusalem rests among encircling mountains as families flourish inside and shadowed rulers approach outside

स्तोत्रसंहिता 125

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 125 विश्वास ठेवणाऱ्या लोकांची तुलना अढळ सियोन पर्वताशी आणि आजूबाजूच्या रक्षणाची तुलना यरुशलेमच्या पर्वतांशी करतो. जुलमी सत्ता कायमची राहणार नाही; प्रामाणिकपणाला प्रोत्साहन दिले जाते, वाकडे मार्ग नाकारले जातात, आणि शांती प्रार्थना संपवते.
सियोनस्थिरतारक्षणशांती
1ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत, कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात.
2यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.
3नीतिमान लोकांना दिलेल्या वतनावर दुष्टांचा राजदंड टिकून राहणार नाही, नाहीतर नीतिमान लोकही त्यांच्या हाताने दुष्टता करतील.
4हे याहवेह, जे नीतिमान आहेत, ज्यांचे हृदय निष्ठावंत आहे, त्यांचे तुम्ही कल्याण करा.
5परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात, त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील. इस्राएलावर शांती असो.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.