
स्तोत्रसंहिता 124
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 124 दैवी मदतीशिवाय काय झाले असते याची कल्पना करतो: शत्रू, राग, पूर आणि दात लोकांना गिळून टाकले असते. त्याऐवजी, शिकार तुटलेल्या सापळ्यातून सुटते आणि कृतज्ञतेने आपल्या सुटकाकर्त्याचे नाव घेते.
सुटकामदतधोकाआभारप्रदर्शन
1सर्व इस्राएलने हे कबूल करावे की— जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
2जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते, जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
3तर त्यांचा संताप आमच्यावर भडकला असता. तेव्हा त्या शत्रूंनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते;
4जलप्रलयात आम्ही बुडून गेलो असतो व जलप्रवाहात आम्ही पार वाहून गेलो असतो,
5उचंबळलेल्या लाटांनी आम्हाला गिळंकृत केले असते.
6याहवेह धन्यवादित असोत; त्यांनी आम्हाला शत्रूंचे भक्ष्य होऊ दिले नाही.
7पारध्याच्या पाशातून पक्षी निसटावा, त्याप्रमाणे आम्ही जिवानिशी निसटलो; पाश तुटलेला आहे आणि आम्ही मुक्त झालो आहोत.
8आमच्या साहाय्याचा उगम, स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते परमेश्वर, याहवेह यांचे नाव आहे.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.