Servants watch their master's hands while weary pilgrims outside lift their eyes toward the sanctuary

स्तोत्रसंहिता 123

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 123 धन्याच्या हाताकडे पाहणाऱ्या सेवकांच्या केंद्रित लक्षासह वर वळतो. थट्टा व गर्विष्ठ तिरस्काराने भरलेला थकलेला समाज गरजेच्या दयेसाठी नम्रपणे, लक्षपूर्वक आणि चिकाटीने वाट पाहतो.
दयाअवलंबित्वतिरस्कारप्रार्थना
1मी माझी दृष्टी वर, तुमच्याकडे लावतो, तुम्ही जे स्वर्गात राजासनारूढ आहात.
2जसा एखादा दास आपली दृष्टी आपल्या धन्याच्या हाताकडे लावतो, किंवा एखादी दासी आपल्या धनिणीच्या हाताकडे नजर लावते, तसेच दया आणि कृपा प्राप्त व्हावी म्हणून, आमची दृष्टी आमचे परमेश्वर याहवेहकडे लागलेली असते.
3आम्हावर दया करा, हे याहवेह, आम्हावर दया करा, कारण आम्ही पुष्कळ तिरस्कार सहन केला आहे.
4उन्मत्त लोकांचा घोर उपहास आम्ही सहन केला आणि गर्विष्ठांच्या घोर घृणेचे पात्र ठरलो आहे.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.