
स्तोत्रसंहिता 113
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 113 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि स्वर्गाच्या उंचीपासून समाजाच्या सर्वात खालच्या ठिकाणांपर्यंत स्तुती पसरवतो. गरिबांना प्रतिष्ठा मिळते, गरजूंना सन्मानित सहवास मिळतो, आणि निपुत्रिक स्त्री कुटुंबात आनंद करते.
स्तुतीप्रतिष्ठागरीबकुटुंब
1याहवेहचे स्तवन करा. हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा; याहवेहच्या नावाची स्तुती करा.
2याहवेहच्या नामाचे स्तवन होत राहो, आता आणि सदासर्वकाळ.
3सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.
4याहवेह सर्व राष्ट्रांहून उच्च आहेत; त्यांचे गौरव गगनमंडळाहून उंच आहे.
5आमचे परमेश्वर याहवेह, यांच्या समान कोण आहे, जे सर्वोच्च स्थानी सिंहासनावर विराजमान असतात,
6जे वरून ओणवून, गगनमंडळ आणि पृथ्वीचे अवलोकन करतात?
7ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्यातून वर उचलून घेतात;
8ते त्यांना राजपुत्रांबरोबर, आपल्या प्रजेच्या प्रधानांसह बसवितात.
9ते निपुत्रिक गृहिणीला तिच्या घरात स्थिरावतात, आणि तिला मुले देऊन आनंदी माता बनवितात. याहवेहचे स्तवन करा.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.