Families cross between receding waters as mountains rise and fresh water pours from rock

स्तोत्रसंहिता 114

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 114 निर्गम व भूमीत प्रवेश जिवंत निर्मिती प्रतिसादात संक्षिप्त करतो. समुद्र व यार्देन मागे हटतात, पर्वत उड्या मारतात, आणि गुलाम बनलेल्या लोकांना पवित्रस्थानात बदलणाऱ्या उपस्थितीसमोर दगड पाणी बनतो.
निर्गमनिर्मितीमुक्तीउपस्थिती
1जेव्हा इस्राएल इजिप्तमधून, परकीय भाषेच्या लोकातून याकोब बाहेर पडला,
2यहूदाह परमेश्वराचे पवित्रस्थान, आणि इस्राएल त्यांचे सार्वभौमत्व झाले.
3तांबड्या समुद्राने हे पाहून पळ काढला, आणि यार्देन नदी माघारी गेली;
4पर्वतांनी मेंढ्यांप्रमाणे आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या.
5हे समुद्रा, तू पलायन का केले? अगे यार्देने, तू मागे का फिरलीस?
6पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांप्रमाणे, टेकड्यांनो, तुम्ही कोकरांसारखे का बागडलात?
7अगे पृथ्वी, तू परमेश्वराच्या समक्षतेत, याकोबाच्या देवासमोर, थरथर काप.
8कारण त्यांनीच खडकाचे झर्‍यात रूपांतर केले, अत्यंत कणखर खडकास जलाचे स्त्रोत बनविले.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.