
स्तोत्रसंहिता 111
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 111 भव्य कार्ये, कृपाळू तरतूद, कराराची विश्वासूपणा, आणि अटळ न्यायाची स्तुती करतो. काळजीपूर्वक सामुदायिक स्मरण आदरयुक्त शहाणपण, अभ्यासलेली समज, आणि एका पिढीपलीकडे चालू राहणाऱ्या कृतज्ञ स्तुतीकडे नेते.
कार्येकरारशहाणपणस्तुती
1याहवेहचे स्तवन होवो. जिथे नीतिमान एकत्र येऊन सभा आयोजित करतात, तिथे मी संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचे स्तवन करेन.
2याहवेहचे कार्य किती उदात्त आहेत, ते त्या अतिमहान कृत्यांचे मनन करतील.
3गौरवशाली व वैभवशाली आहेत याहवेहची कृत्ये, आणि त्यांची नीतिमत्ता सर्वकाळ टिकते.
4याहवेहनी आपल्या या कृत्यांना अविस्मरणीय केले आहे; ते कृपाळू व दयाळू आहेत.
5जे त्यांचे भय धरतात त्यांना ते अन्नाचा पुरवठा करतात; ते आपला करार नेहमी स्मरणात ठेवतात.
6त्यांच्या कृत्यांचे सामर्थ्य त्यांच्या लोकांना प्रकट होण्यास, त्यांनी अन्य राष्ट्रांची भूमी त्यांना वतनादाखल दिली.
7त्यांच्या हाताने केलेली सर्व कृत्ये न्याय्य आणि विश्वसनीय असतात; त्यांचे सर्व नियम विश्वासयोग्य असतात.
8ते नियम सदासर्वकाळ अटळ आहेत, सत्य आणि सात्विकतेला अनुसरून तयार केलेले आहेत.
9त्यांनी आपल्या लोकांना मुक्तता दिली आहे; त्यांनी आपला करार अनंतकाळासाठी स्थापित केला आहे— त्यांचे नाव पवित्र व भयावह आहे.
10याहवेहचे भय सुज्ञानाचा प्रारंभ होय; त्यांच्या नियमाचे पालन करणार्यांना उत्तम आकलन शक्ती प्राप्त होते. याहवेहची सदासर्वकाळ स्तुती होवो.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.