A priest offers bread and a cup to a kneeling king beside gathered volunteers and abandoned weapons

स्तोत्रसंहिता 110

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 110 दैवीरित्या अधिकृत शासकाचे चित्रण करतो ज्याच्या शत्रूंना त्याची राजवट उलथून टाकता येत नाही. राजेशाही विजय मलकीसेदेकशी संबंधित चिरस्थायी याजकपदाशी जोडला जातो, तर स्वेच्छेने येणारे लोक पहाटेच्या दवाच्या ताजेपणासह जमतात.
राजपदयाजकपदअधिकारविजय
1याहवेह माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.”
2याहवेहच सीयोनातून तुझ्या सामर्थ्यवान राजदंडाचा विस्तार करतील व म्हणतील, “तू तुझ्या शत्रूंवर सत्ता गाजव!”
3तुझी सेना युद्ध समयी स्वेच्छेने तुला साथ देईल. प्रातःकाळाच्या गर्भातून जन्मलेल्या दवाप्रमाणे पवित्रतेने सुशोभित होऊन तुझे तरुण तुझ्याकडे येतील.
4याहवेहने जी शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”
5तुझ्या उजव्या हाताशी प्रभूचे सानिध्य आहे; आपल्या क्रोधाच्या दिवशी ते अनेक राजांना तुडवतील.
6ते राष्ट्रांवर आपला यथार्थ निकाल घोषित करतील, मृतदेहांचा ढीग लागेल आणि ते संपूर्ण पृथ्वीच्या शासकांना चिरडून टाकतील.
7तेव्हा प्रभू वाटेवरील ओहोळातील पाणी पितील, आणि आपले मस्तक उंचावतील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.