A reunited couple standing in a garden of lilies and pomegranates at sunrise

गीतरत्न 6

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्त्रीला माहीत आहे की तिचा प्रियकर बागेत गेला आहे, आणि ती त्यांच्या परस्पर आपलेपणाची पुष्टी करते. तो राण्या व दासींमध्ये तिचे सौंदर्य, वेगळेपण आणि प्रभावी तेज साजरे करतो. बाग, पहाट, चंद्र, सूर्य, ध्वज आणि परतणारी शूलामीथ अध्यायाचे नूतनीकृत आश्चर्य आकार देतात.
पुनर्मिलनपरस्पर आपलेपणावेगळेपणतेजबाग
1हे सर्व स्त्रियांमधील परमसुंदरी, तुझा प्रियकर कुठे गेला? कोणत्या मार्गाने वळला आहे, की तुझ्याबरोबर आम्हीही त्याला शोधू?
2माझा प्रियकर त्याच्या बागेत, आपल्या सुगंधी झाडांच्या वाफ्यात, तो कमळिनी शोधून गोळा करण्यास तो गेला आहे.
3मी माझ्या प्रियकराची आहे, आणि माझा प्रियकर माझाच आहे; कमळिनीमध्ये तो फुले शोधित आहे.
4माझ्या प्रिये, तू तिरजाह नगरीसारखी सुंदर आहेस, जसे यरुशलेम मनोहर आहे, जसे ध्वज फडकविणारे विजयी सैन्य तशी तू ऐश्वर्यशाली आहे.
5माझ्यावरून तू आपली दृष्टी काढ; कारण तुझे नयन मला भारावून सोडतात. तुझे केस गिलआद डोंगरावर चकाकणार्‍या शेळ्यांच्या कळपाप्रमाणे आहेत.
6तुझे दात नुकत्याच धुतलेल्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे आहेत. प्रत्येकाला आपले जुळे आहेत, त्यात एकही उणा नाही.
7ओढणीआड असलेले तुझे गाल डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
8तिथे साठ राण्या, आणि ऐंशी उपपत्नी, आणि कुमारिका तर असंख्य असतील;
9पण हे माझ्या कबुतरे, तू परिपूर्ण, व निराळी आहेस, तिच्या आईची एकुलती एक कन्या असून, जिने तिला जन्म दिला तिची लाडकी आहे. तरुण स्त्रियांनी तिला पाहून, धन्य म्हटले; राण्या व उपपत्नी यांनी देखील तिची प्रशंसा केली.
10जो पहाटेसारखा प्रसन्न, चंद्रासारखा मनोरम, सूर्यासारखा प्रकाशमान, मिरवणुकीतील तार्‍यासारखे गौरवी दिसणारे असे हे कोण आहे?
11दर्‍याखोर्‍यात वाढत असलेली नवी झाडे, द्राक्षवेलींना आलेले अंकुर, आणि डाळिंबाला आलेली फुले पाहण्यासाठी मी खाली अक्रोडाच्या झाडांच्या मळ्यात गेलो.
12मला समजण्यापूर्वी, माझ्या इच्छेने मला माझ्या लोकांच्या शाही रथामध्ये स्थान दिले.
13परत ये, शुलेमकन्ये परत ये; आम्ही तुला न्याहाळावे म्हणून परत ये, परत ये! मित्र महनाईमचे नृत्य पाहण्यासारखे तुम्ही शुलेमकन्येला का न्याहाळता?

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.