Priests and families bow before the veiled ark between cherubim as incense rises in the sanctuary

स्तोत्रसंहिता 99

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 99 अतींद्रिय पवित्रतेला प्रतिसादात्मक नातेसंबंधासोबत जोडतो. न्यायी राजा समानतेवर प्रेम करतो, तर मोशे, अहरोन आणि शमुवेल सामुदायिक उपासनेपूर्वी उत्तर, क्षमा आणि आवश्यक शिस्त मिळवणाऱ्या प्रार्थनेचे उदाहरण देतात.
पवित्रतान्यायप्रार्थनाक्षमा
1याहवेह राज्य करतात, राष्ट्रे थरथर कापोत; ते करुबांमध्ये सिंहासनावर आरूढ झाले आहेत; सर्व पृथ्वी कंपित होवो.
2अतिमहान होत सीयोनातील याहवेह; ते सर्व राष्ट्रात परमोच्च असे आहेत.
3राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत— याहवेह पवित्र आहेत.
4राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे— तुम्ही याकोबात निष्पक्षपात प्रस्थापित केला; जो न्यायसंगत व रास्त आहे.
5आपले परमेश्वर याहवेहची थोरवी गा, व त्यांच्या चरणी आराधना करा; याहवेह पवित्र आहेत.
6मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते, व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्‍यांपैकी होते; यांनी याहवेहचा धावा केला, आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.
7ते त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलले; त्यांच्याकडे सोपविलेल्या अधिनियमांचे व आदेशांचे त्या लोकांनी पालन केले.
8याहवेह, आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांना उत्तर दिले; त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना शिक्षा केली, तरी इस्राएलसाठी तुम्ही क्षमाशील परमेश्वर होता.
9आपल्या परमेश्वराची थोरवी गा, आणि त्यांच्या पवित्र पर्वतावर उपासना करा, कारण आपले परमेश्वर याहवेह पवित्र आहेत.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.