
स्तोत्रसंहिता 100
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 100 संपूर्ण पृथ्वीला आनंदी सेवा, आनंदी गीत आणि कृतज्ञ पवित्रस्थानाच्या अंगणांत आमंत्रित करतो. उपासना निर्माता व मेंढपाळाच्या मालकीवर विसावते ज्याची चांगुलपणा, स्थिर प्रेम आणि विश्वासूपणा प्रत्येक पिढीत टिकतात.
आभारप्रदर्शनआनंदआपलेपणाविश्वासूपणा
1हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर.
2आनंदाने याहवेहची आराधना करा; हर्षगीतांसह त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करा.
3याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या. ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत; आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत.
4उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा; स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा; त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
5कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे; त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.