
स्तोत्रसंहिता 93
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 93 गर्जणाऱ्या समुद्रांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली भव्य राज्याची घोषणा करतो. जग स्थिर उभे राहते, प्राचीन अधिकार अचल राहतो, विश्वासार्ह हुकूम टिकतात, आणि पवित्रता उपासनास्थळाला योग्यरित्या चिन्हांकित करते.
सार्वभौमत्वभव्यतास्थिरतापवित्रता
1याहवेह राज्य करतात; ऐश्वर्याची वस्त्रे त्यांनी परिधान केली आहेत; याहवेहनी राजेशाही वस्त्रे परिधान केली आहेत आणि ते शक्तीने सुसज्जित आहेत; निश्चितच, त्यांनी पृथ्वी अत्यंत स्थिर व अढळ केलेली आहे.
2तुमचे सिंहासन अनादिकालापासून स्थापलेले आहे; तुम्ही अनंतकाळापासून आहात.
3याहवेह, महासागर उसळत आहेत; महासागरांनी त्यांचा स्वर उंच केलेला आहे; समुद्राच्या प्रचंड लाटांचा प्रहार उग्र होत आहे.
4सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली, तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात— सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत.
5हे याहवेह, तुमच्या आज्ञा अटळ आहेत; पवित्रता हे तुमच्या भवनाचे अनंतकाळचे आभूषण आहे.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.