
स्तोत्रसंहिता 67
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 67 दैवी आशीर्वादासाठी विनंती करतो जेणेकरून प्रत्येक राष्ट्राला देवाचा तारक मार्ग कळावा. न्याय्य मार्गदर्शन लोकांना आनंदाचे कारण देते, पृथ्वी आपले पीक देते, आणि मिळालेली विपुलता जगाच्या दूरच्या सीमांपर्यंत पसरणारी साक्ष बनते.
राष्ट्रेआशीर्वादन्यायपीक
1परमेश्वर आमच्यावर कृपा करो आणि आम्हाला आशीर्वाद देवो आणि त्यांचा मुखप्रकाश आम्हावर पडो; सेला
2यासाठी की पृथ्वीवर तुमचे मार्ग प्रकट व्हावे, तुम्ही सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना कळावे.
3हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत, सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.
4राष्ट्रे हर्ष करोत आणि आनंदाने जयघोष करोत, कारण तुम्ही न्यायाने लोकांचा न्यायनिवाडा कराल आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवाल. सेला
5हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत; सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.
6कारण पृथ्वीने विपुल उपज दिला आहे; परमेश्वर, आमचे परमेश्वर, आम्हाला आशीर्वाद देतात.
7परमेश्वर आम्हाला अजूनही आशीर्वाद देवोत, जेणेकरून पृथ्वीवरील सर्व सीमा त्यांचे भय धरतील.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.