
स्तोत्रसंहिता 64
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 64 गुप्त कटांपासून आणि बाणांसारख्या धारदार क्रूर भाषणापासून रक्षण मागतो. दुष्ट गृहीत धरतात की त्यांचे सापळे दिसत नाहीत, तरी न्याय येतो तेव्हा त्यांचेच शब्द त्यांना उघड करतात, सरळांना आनंदित व आश्रय घेण्यास सोडत.
रक्षणन्यायकटआश्रय
1हे परमेश्वरा, माझे गार्हाणे ऐका; शत्रूंच्या भयापासून माझ्या जिवास सुरक्षित ठेवा.
2दुष्टांच्या षडयंत्रापासून आणि गुन्हेगार टोळक्यांच्या कारस्थानापासून मला लपवा.
3तलवारीप्रमाणे ते आपल्या जिभांना धारदार करतात आणि बाणांप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या कटुशब्दांनी लक्ष्य करतात.
4दबा धरून ते निरपराध्यांवर बाण सोडतात; ते निर्भयपणे अकस्मात त्यांच्यावर मारा करतात;
5दुष्कृत्य करण्यास ते एकमेकांना प्रोत्साहन देतात; सापळे आखण्यासाठी ते गुप्तपणे एकत्र जमतात; ते म्हणतात, “ते कोण पाहणार?”
6ते कुटिल योजना बनवून म्हणतात, “आता आम्ही उत्तम योजना तयार केली आहे!” मानवी अंतःकरण आणि हृदय समजणे कठीण आहे.
7परंतु स्वतः परमेश्वरच त्यांचा बाण मारतील; अचानक ते घायाळ होतील.
8परमेश्वर त्यांची जीभ त्यांच्याच विरुद्ध करतील आणि त्यांचा नाश करतील. जे सर्व त्यांना पाहतील, ते उपहासाने आपले डोके हालवतील.
9मग सर्व मानव घाबरतील; ते परमेश्वराच्या कृत्यांची थोरवी गातील; आणि त्यांनी केलेल्या चमत्काराविषयी मनन करतील.
10पण नीतिमान लोक याहवेहमध्ये आनंद करतील व त्यांचा आश्रय घेतील, सरळ हृदयाचे त्यांचे स्तवन करतील!
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.