Fugitives rest beneath nesting birds as a musician tunes his harp and enemies struggle in their net

स्तोत्रसंहिता 57

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 57 धोका निघून जाईपर्यंत आणि पाठलाग करणारे सापळे तयार करत असताना पंखांखाली आश्रय शोधतो. स्थिर हृदय वीणा, तंतुवाद्य आणि पहाटेलाच जागृत करते, खाजगी गुहेतील प्रार्थनेला राष्ट्रांमधील स्तुतीत विस्तारत.
आश्रयस्थिर हृदयस्तुतीदया
1माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे; संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या छायेखाली आश्रय घेईन.
2जे मला निर्दोष ठरवितात, त्या सर्वोच्च परमेश्वराचा मी धावा करेन.
3ते स्वर्गातून साहाय्य पाठवून माझे तारण करतील; जे माझा पाठलाग करतात त्यांचा ते तिरस्कार करतात; सेला परमेश्वर त्यांची प्रीती आणि विश्वासूपणा पाठवून देतील.
4सिंहांनी मला घेरले आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवार आहे अशा हिंसक स्वभावाच्या मनुष्यांमध्ये मी पडलो आहे.
5हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.
6माझ्या पावलांसाठी त्यांनी सापळा लावला आहे— संकटात मी वाकून गेलो होतो. माझ्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला होता— परंतु ते स्वतःच त्यात पडले आहेत. सेला
7हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.
8हे माझ्या जिवा, जागृत हो! अगे सारंगी, आणि वीणे, जागृत व्हा! मी प्रातःकाळाला जागृत करेन.
9हे प्रभू, मी प्रत्येक राष्ट्रात तुमची स्तुती करेन, मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
10कारण तुमचे वात्सल्य महान असून ते गगनमंडळाला भिडले आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.
11हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.