A violent thunderstorm breaks a cedar as worshipers watch safely from a stone sanctuary

स्तोत्रसंहिता 29

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 29 समुद्रापासून जंगल व वाळवंटाकडे जाणाऱ्या गडगडाटाद्वारे दैवी महिमा ऐकतो. निर्मिती थरथरते, उपासना विस्मयाने प्रतिसाद देते, आणि प्रचंड प्रदर्शन लोकांसाठी सामर्थ्य व शांतीने संपते.
वादळनिर्मितीगौरवशांती
1अहो दिव्यदूतांनो, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
2याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; पवित्रतेच्या वैभवाने याहवेहची उपासना करा.
3याहवेहची वाणी जलांवर आहे; गौरवशाली याहवेहची वाणी महा जलाशयांवर गर्जत आहे.
4याहवेहची वाणी प्रतापशाली आहे; प्रभावी आहे याहवेहचा स्वर.
5याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात; लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात.
6लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे आणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो;
7याहवेहचा आवाज कडाडतो, विजा चमकल्यासारखा.
8याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात; कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात.
9याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात आणि वने पर्णहीन होतात. आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.”
10याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत; याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत.
11याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात; याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.