A king and community pray near offerings while horses and military standards stand distant

स्तोत्रसंहिता 20

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 20 संघर्षापूर्वी आपल्या राजासाठी प्रार्थना करण्यासाठी लोकांना जमवतो. अर्पणे, योजना आणि नेतृत्व देवाकडे सोपवले जातात, तर विश्वास रथ व घोड्यांच्या दिसणाऱ्या सामर्थ्यापलीकडे राहतो.
प्रार्थनाराजपदविश्वाससमाज
1संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.
2त्यांच्या पवित्रस्थानातून ते तुला मदत पाठवो आणि ते तुला सीयोनातून साहाय्य पाठवो.
3तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो आणि तुझी होमार्पणे ते स्वीकारोत. सेला
4तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत.
5तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू आणि आपल्या परमेश्वराच्या नावाने आपला झेंडा उंचावू. याहवेह तुझे सर्व मनोरथ पूर्ण करोत.
6आता मला माहीत आहे: याहवेह आपल्या अभिषिक्तास विजय प्रदान करतात; पवित्र स्वर्गातून त्यांच्या तारणदात्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने त्याला उत्तर देतात.
7कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.
8ती कोसळतील आणि नाश पावतील, पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू.
9याहवेह, राजाला विजयी करा! जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा आमचे ऐका!

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.