Trumpets, harps, lyres, drums, flutes, cymbals, dancers, families, and animals celebrate at sunrise

स्तोत्रसंहिता 150

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 150 केंद्रित, अनिर्बंध स्तुतीने स्तोत्रसंहिता पूर्ण करतो. पवित्रस्थान व आकाश, भव्य कार्ये व अतुलनीय महानता, कर्णा व तंतुवाद्ये, ताल व झांजा, नृत्य आणि प्रत्येक श्वास घेणारा प्राणी एक अंतिम गायकवृंद बनतात.
स्तुतीसंगीतपवित्रस्थाननिर्मिती
1याहवेहचे स्तवन करा. त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा; त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा;
2त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा; त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा;
3कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा; सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा;
4डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा; तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.
5खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा; झणझणणार्‍या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.
6प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो. याहवेहचे स्तवन करा.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.