
स्तोत्रसंहिता 149
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 149 नवीन सामुदायिक गीत, नृत्य, संगीत आणि नम्र लोकांच्या सन्मानाचा उत्सव साजरा करतो. स्तुती जुलमी सत्तेवरील जबाबदार न्यायासोबत उभी राहते, अनियंत्रित वैयक्तिक सूडाऐवजी विश्वासू विजय म्हणून चित्रित केली जाते.
नवीन गीतआनंदन्यायविजय
1याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.
2हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा.
3त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा.
4कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो; ते नम्रजनांस विजयी करतात.
5या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत.
6त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून,
7राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्यास सिद्ध व्हावे;
8त्या राष्ट्रांच्या राजांना बेड्या घाला आणि त्यांच्या पुढार्यांना लोखंडी साखळदंडानी बांधा.
9त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा. हाच याहवेहच्या विश्वासू लोकांचा गौरव आहे. याहवेहचे स्तवन करा.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.