
स्तोत्रसंहिता 133
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 133 सामुदायिक एकतेला मौल्यवान, विपुल आणि जीवनदायी म्हणून साजरे करतो. सुगंधी अभिषेकाचे तेल आणि ताजातवाना करणारे पर्वतीय दव आशीर्वादाचे चित्र देतात जो व्यक्तींपलीकडे वाहतो, विविध कराराच्या कुटुंबाला सामायिक जीवनात एकत्र आणत.
एकताअभिषेकआशीर्वादसमाज
1ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते, जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,
2ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान, त्याच्या दाढीवर ओघळलेल्या, अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या, झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे.
3हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्या हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे. कारण हे ते स्थान आहे, ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.