
स्तोत्रसंहिता 121
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 121 यात्रेकरूचे डोळे पर्वतांपलीकडे कधीही न झोपणाऱ्या निर्माता व रक्षकाकडे उचलतो. सावली, जागरूक उपस्थिती, आणि व्यापक रक्षण प्रत्येक पाऊल, प्रस्थान आणि आता व भविष्यातील परतीसोबत असतात.
रक्षणयात्राविश्वासरक्षक
1मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो— मला साहाय्य कुठून येईल?
2स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते याहवेह, तेच माझ्या साहाय्यतेचा उगम आहेत.
3ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत; तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.
4खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत किंवा डुलकीही घेत नाहीत.
5याहवेह स्वतः तुझे रक्षण करतात— याहवेह तुझ्या उजव्या हाताजवळ सावलीसारखे आहेत.
6दिवसाच्या सूर्याची तुला बाधा होणार नाही, आणि रात्रीच्या चंद्राची देखील नाही.
7याहवेह सर्व अनिष्टांपासून तुला सुरक्षित ठेवतील— आणि तुझ्या जिवाचे रक्षण करतील.
8तुझे आता आणि सर्वकाळ येणे व जाणे, यावर याहवेह बारकाईने लक्ष ठेवतील.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.