A peace-seeking man raises an open hand between armed desert archers and deceitful negotiators

स्तोत्रसंहिता 120

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 120 खोट्या ओठांच्या व विनाशकारी भाषणाच्या त्रासाने यात्रेच्या गीतांना सुरुवात करतो. शांतीपासून दूर राहणारा वक्ता शांततापूर्ण हेतूंना युद्धाने उत्तर देणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये सत्य व सलोख्याची तळमळ करतो.
सत्यशांतीत्रासयात्रा
1संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली, आणि त्यांनी ती ऐकली.
2हे याहवेह, असत्य बोलणार्‍या ओठांपासून व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.
3अगे कपटी जिभे, ते तुला काय करतील, आणखी तुला कशी वागणूक मिळेल?
4ते तुला योद्ध्यांच्या तीक्ष्ण बाणांनी, केरसुणीच्या लाकडांच्या निखार्‍यांनी दंड करतील.
5धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!
6जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात मी बराच काळ घालविला आहे.
7मी तर शांतताप्रिय आहे; पण मी काही बोलताच ते युद्धास तयार होतात.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.