
गीतरत्न 3
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
रात्री आपल्या प्रियकराला शोधू न शकणारी स्त्री रस्ते व चौक शोधते, पहारेकऱ्यांना विचारते, आणि अखेर त्याला घट्ट धरते. दृश्य नंतर शलमोनच्या सुगंधी, रक्षित मिरवणुकीकडे, समृद्ध सजवलेल्या गाडीकडे, विवाहाच्या मुकुटाकडे आणि सार्वजनिक आनंदाकडे वळते.
शोधपुनर्मिलनभक्तीविवाह मिरवणूकआनंद
1रात्रभर माझ्या अंथरुणावर मी त्याला शोधत होते ज्याच्यावर माझे हृदय प्रेम करते; मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही.
2मी आता उठेन आणि शहरभर फिरेन, त्याच्या रस्त्यावर आणि चौकात जाऊन; माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते त्याचा मी शोध करेन. मग मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही.
3जे पहारेकरी नगरात गस्त घालतात त्यांना मी आढळले तेव्हा मी त्यांनाच विचारले, मी त्यांना विचारले, “माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते, तो तुम्हाला दिसला काय?”
4पहारेकर्यांपासून जराशी दूर गेले आणि ज्यावर माझे हृदय प्रीती करते तो मला सापडला मी त्याला बिलगले आणि माझ्या आईच्या घरी, जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणेपर्यंत त्याला जाऊ दिले नाही.
5यरुशलेमच्या कन्यांनो, तुम्हाला रानातील मृगांची आणि हरिणीची शपथ, त्याची इच्छा आहे तोपर्यंत माझ्या प्रेमाला जागे करू नका.
6हा धुराच्या स्तंभासारखे व्यापाऱ्यांच्या सर्व सुगंधित पदार्थांनी, ऊद आणि गंधरस यांनी सुगंधित, असा रानातून हा कोण येत आहे?
7पाहा! ही तर शलोमोनाची पालखी आहे! इस्राएलातील निवडलेल्या साठ योद्ध्याच्या दलाच्या पहाऱ्यात आलेली आहे.
8ते सर्व धनुर्धारी, आणि युद्धात अनुभवी आहेत. रात्री होणार्या आतंकासाठी सज्ज असलेले, प्रत्येकाने आपली तलवार सोबत घेतली आहे.
9शलोमोन राजाने लबानोनाच्या लाकडाची ही पालखी; स्वतःसाठी बनविली आहे.
10त्याचे खांब चांदीचे आहेत, त्याचे तळ सोन्याचे आहे. त्यातील बैठक जांभळ्या वस्त्रांची आहे, तिच्या आतील भागाला यरुशलेमच्या कन्यांनी प्रेमाने वेलबुट्टीने मढविले आहे. यरुशलेमच्या तरुणीकडून प्रेमपूर्वक भेट.
11अहो सीयोनच्या कन्यांनो, बाहेर या आणि पाहा, शलोमोन राजा कसा मुकुटमंडित आहे ते पाहा, त्याच्या विवाहाच्या दिवशी त्याच्या आईने त्याला तो घातला आहे, त्याचे हृदय आनंदित झाले तो हा दिवस.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.