People dismantle fallen statues beneath lightning mountains while worshipers gather toward a sunlit sanctuary

स्तोत्रसंहिता 97

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 97 वादळ, अग्नी, वीज आणि पर्वतांद्वारे सार्वभौम राज्य चित्रित करतो, मूर्ती व खोटी उपासना नम्र करत. न्याय व नीतिमत्ता या राज्याला समर्थन देतात, तर विश्वासू हृदयांसाठी प्रकाश व आनंद पेरले जातात.
सार्वभौमत्वन्यायमूर्तीआनंद
1याहवेह राज्य करतात, सर्व पृथ्वी उल्हासित होवो; दूर असलेले तटवर्ती क्षेत्रही हर्ष करोत.
2मेघ व गडद अंधकार यांनी ते वेढलेले आहेत; धार्मिकता आणि न्याय त्यांच्या राजासनाचा पाया आहे.
3अग्नी त्यांच्यापुढे चालतो, आणि त्यांच्या शत्रूंना तो सर्व बाजूने भस्म करतो.
4त्यांच्या विजा जगाला प्रकाश देतात; हे पाहून पृथ्वी कंपित होते.
5याहवेहच्या उपस्थितीत, समस्त पृथ्वीचे सत्ताधीश व सगळे पर्वत मेणाप्रमाणे वितळतात.
6आकाश मंडल त्यांची नीतिमत्ता जाहीर करते; संपूर्ण मानवजात त्यांचे गौरव पाहते.
7जे प्रतिमांची प्रौढी मिरवित होते, ते मूर्तींचे सर्व उपासक फजीत झाले. सर्व दैवतांनो, त्यांची आराधना करा!
8सीयोन ऐकते व उल्हासित होते, याहवेह, तुमच्या निर्णयामुळे, यहूदीयातील गावे हर्षभरित होतात.
9कारण याहवेह तुम्हीच पृथ्वीवर परमश्रेष्ठ आहात; सर्व दैवतांहून तुम्ही अत्यंत थोर आहात.
10याहवेहवर प्रीती करणारे वाईटाचा द्वेष करोत, कारण ते त्यांच्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतात आणि दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवितात.
11नीतिमानांवर प्रकाश उजळतो आणि निष्ठावंताची हृदये हर्ष पावतात.
12सर्व नीतिमान, याहवेहच्या ठायी आनंद करा, आणि त्यांच्या पवित्र नावाला गौरव द्या.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.