Families from many lands gather with musicians and dancers inside Jerusalem's open gates

स्तोत्रसंहिता 87

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 87 सियोनला प्रिय पाया म्हणून स्तुती करतो ज्याचे नागरिकत्व आश्चर्यकारकपणे दूरवर पोहोचते. पूर्वीचे बाहेरचे व दूरचे लोक मूळ जन्मलेले मानले जातात, तर गायक व नर्तक शहराला सामायिक स्रोत म्हणून साजरा करतात.
सियोनराष्ट्रेआपलेपणाउत्सव
1त्यांनी पवित्र पर्वतावर त्यांच्या नगरीचा पाया घातला.
2याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा, सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे.
3परमेश्वराच्या नगरी, तुझ्याबद्दल या उत्कृष्ट गोष्टी कथन होतात: सेला
4“मी नोंद करेन की, राहाब आणि बाबिलोन हे देश माझे अस्तित्व मान्य करतात— पलेशेथ, सोर आणि कूश देखील असेच करतात— ते म्हणतील की, ‘हा सीयोनात जन्मलेला आहे.’ ”
5खरोखर, त्या दिवसात सीयोनाबाबत म्हटले जाईल, “हा आणि तो सीयोनात जन्मलेला आहे, आणि प्रत्यक्ष देवाधिदेव या शहराला प्रस्थापित करतील.”
6नागरिकांच्या नोंदवहीत याहवेह लिहितील: “याचा जन्म सीयोनात झाला आहे.” सेला
7संगीत समारंभात ते गातील, “माझे सर्व झरे तुमच्यामध्येच आहेत.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.