
स्तोत्रसंहिता 85
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 85 पुनर्स्थापित कृपा आठवतो तर नूतनीकृत जीवन मागतो. त्याची दृष्टी स्थिर प्रेम, विश्वासूपणा, नीतिमत्ता आणि शांतीला एकत्र आणते, दैवी चांगुलपणा व मानवी भरभराट भेटणाऱ्या फलदायी भूमीचे वचन देत.
पुनर्स्थापनाशांतीविश्वासूपणापुनरुज्जीवन
1हे याहवेह, तुमच्या भूमीवर तुम्ही कृपा केली आहे; याकोबाचे ऐश्वर्य तुम्ही त्याला परत दिले आहे.
2तुम्ही आपल्या लोकांच्या अपराधाची क्षमा केली आणि त्यांच्या पातकावर पांघरूण घातले. सेला
3म्हणजेच तुमचा सर्व क्रोध शांत झाला आहे, तुमचा भडकलेला संताप आता शमला आहे.
4हे परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या, आम्हाला पुनर्स्थापित करा. आमच्याविरुद्ध तुमचा क्रोध पुन्हा भडकू देऊ नका.
5तुम्ही आमच्यावर सतत कोपलेले राहणार आहात काय? पिढ्यान् पिढ्यांवर तुमचा राग टिकून राहणार आहे काय?
6तुमचे लोक तुमच्या ठायी हर्षित व्हावे, म्हणून तुम्ही आम्हाला पुनरुज्जीवित करणार नाही काय?
7हे याहवेह, तुमच्या अक्षयप्रीतीचा आम्हावर वर्षाव करा आणि तुमचे तारण आम्हाला प्रदान करा.
8परमेश्वर याहवेह जे बोलतील, ते सर्व मी ऐकणार; कारण त्यांनी आपल्या लोकांना व आपल्या भक्तांना शांतीचे अभिवचन दिले आहे. परंतु आपल्या लोकांनी मूर्खपणा करण्याचे थांबवावे.
9याहवेहचे भय बाळगणारे खरोखरच त्यांच्या तारणाच्या समीप असतात; मग आपला देश त्यांच्या गौरवाने भरून जाईल.
10प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत; नीतिमत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
11पृथ्वीतून विश्वसनीयता उदय पावत आहे, आणि स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे.
12याहवेह उत्तम गोष्टीं आम्हाला प्रदान करणार आहेत, आणि आमची भूमी मुबलक पीक देणार आहे.
13नीतिमत्व त्यांच्या पुढे चालेल आणि प्रभूच्या पावलांसाठी मार्ग सिद्ध करेल.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.