
स्तोत्रसंहिता 82
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 82 दुष्टांना अनुकूल असलेल्या शासकांवर आरोप ठेवतो तर दुर्बल, अनाथ, गरीब आणि जुलूम झालेले असुरक्षित राहतात. त्यांचा अन्याय समाजाचा पाया हादरवतो, खरा न्यायाधीश योग्य व्यवस्था पुनर्स्थापित करावी म्हणून विनंती करत.
न्यायअसुरक्षितन्यायदाननेतृत्व
1परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:
2तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला
3दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा, गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.
4दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा; दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.
5इतर “दैवतां” ना काहीही कळत नाही, काहीही समजत नाही. ते अंधकारात चालतात; पृथ्वीचे सर्व पाये डळमळीत झाले आहेत.
6“मी म्हटले, ‘तुम्ही “दैवते” आहात; तुम्ही सर्वोच्च परमेश्वराचे पुत्र आहात.’
7परंतु तुम्ही मर्त्य मानवांप्रमाणेच मराल; आणि इतर शासकाप्रमाणे तुमचे पतन होईल.”
8हे परमेश्वरा, उठा आणि जगाचा न्याय करा, कारण समस्त राष्ट्र तुमचे वतन आहे.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.