An ancient family with children and sheep gazes across a moonlit world full of creatures

स्तोत्रसंहिता 8

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 8 अर्भकांच्या स्तुतीपासून चंद्र व ताऱ्यांपर्यंत पाहते, लहान मानवांना प्रतिष्ठा व जबाबदारी मिळते याचे आश्चर्य वाटत. मानवतेला विशाल निर्मित व्यवस्थेत लक्षपूर्वक काळजी सोपवली आहे.
निर्मितीमानवी प्रतिष्ठाआश्चर्यकारभार
1याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे! स्वर्गदेखील तुमचे गौरव प्रकट करते.
2लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.
3जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,
4मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?
5तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे.
6तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.
7सर्व कळप व गुरे, आणि वनपशू.
8आकाशातील पक्षी, आणि समुद्रातील मासे, सागरात संचार करणारे सर्व प्राणी.
9याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे!

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.