
स्तोत्रसंहिता 70
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 70 संकटाला तातडीच्या विनंतीत संक्षिप्त करतो: लवकर मदतीला ये. विनवणी करणारा दुष्ट पाठलाग करणारे मागे फिरावेत, शोधणाऱ्यांना आनंद व्हावा, आणि तारणावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने गरीब सुटकेची वाट पाहत असतानाही देवाची सतत महिमा करावी अशी विनंती करतो.
तातडीसुटकानम्रताआनंद
1हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा; याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या.
2माझा जीव घेऊ पाहणार्यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत.
3जे लोक मला, “अहाहा! अहाहा!” म्हणतात, ते लज्जित होऊन माघारी फिरोत.
4परंतु जे सर्व तुमचा शोध घेतात ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत; जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात ते सर्व नेहमी हेच म्हणोत, “परमेश्वर किती महान आहेत!”
5परंतु मी तर गरीब आणि गरजवंत आहे; हे परमेश्वरा, माझ्याकडे त्वरेने या. तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात; याहवेह, विलंब करू नका.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.