
स्तोत्रसंहिता 61
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 61 पृथ्वीच्या टोकांपासून मानवी आवाक्यापलीकडील आश्रयाकडे क्षीण ओरड घेऊन जातो. स्तोत्रकार निवारा मागतो, सुरक्षित वारसा आठवतो, आणि देवाच्या विश्वासू रक्षणाखाली चिरस्थायी स्तुतीचे वचन देतो.
आश्रयप्रार्थनारक्षणविश्वासूपणा
1हे परमेश्वरा, माझा धावा ऐका, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.
2दिगंतापासून मी तुमचा धावा करतो माझे हृदय व्याकूळ झाले असताना; तुम्हीच मला उंच खडकावर न्या.
3कारण तुम्हीच माझे आश्रयस्थान, शत्रूविरुद्ध उंच बुरूज आहात.
4तुमच्या मंडपात सदासर्वकाळ राहण्यास आणि तुमच्या पंखांच्या सावलीखाली आश्रय घेण्यास मी उत्कंठित आहे. सेला
5कारण परमेश्वरा, मी तुम्हाला केलेला नवस तुम्ही ऐकला आहे आणि तुमच्या नावाचे भय धरणार्यांचे वतन तुम्ही मला दिले आहेत.
6तुम्ही राजाचे आयुष्य वाढवा; ते अनेक पिढ्यांमधील पूर्ण भरलेल्या वर्षाप्रमाणे होवो.
7तो परमेश्वराच्या समोर सदासर्वकाळ राहो. तुमची प्रीती आणि सत्य त्याच्या रक्षणाकरिता प्रकट करा.
8म्हणजे मी तुमच्या नावाला सतत धन्यवाद देईन आणि दररोज माझी शपथ पूर्ण करेन.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.