An accused exile follows beams of light toward Jerusalem and waiting harp music

स्तोत्रसंहिता 43

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 43 कपटी विरोधापासून न्यायीकरण शोधतो आणि नकार इतका खरा का वाटतो असे विचारतो. प्रकाश व सत्य पवित्र डोंगराकडे परत नेणारे मार्गदर्शक बनतात, जिथे खिन्न आत्मा नूतनीकृत उपासना व स्तुतीची अपेक्षा करतो.
मार्गदर्शनन्यायीकरणउपासनाआशा
1परमेश्वर, मला निर्दोष ठरवा आणि भक्तिहीन पिढीविरुद्ध माझ्या बाजूने निकाल द्या. या दुष्ट आणि कपटी लोकांपासून माझा बचाव करा.
2कारण परमेश्वर तुम्हीच माझे बळकट दुर्ग आहात; तुम्ही माझा त्याग का केला? शत्रूंद्वारे होणार्‍या छळामुळे मी का दुःखी व्हावे?
3तुमचा प्रकाश आणि तुमचे सत्य मला लाभोत; तीच मला मार्ग दाखवोत; तुमच्या पवित्र पर्वतावरील, तुमच्या निवासमंडपात, तीच मला घेऊन जावोत.
4तेव्हा मी परमेश्वराच्या वेदीजवळ जाईन, तेच परमेश्वर जे माझे परमानंद आहेत; आणि तिथे हे परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, वीणेवर मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
5हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.