
स्तोत्रसंहिता 4
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 4 त्रास, राग आणि रिकामा पाठलाग प्रामाणिक संध्याकाळच्या प्रार्थनेत आणते. स्तोत्रकार भौतिक विपुलतेपेक्षा खोल आनंद शोधतो आणि देवाच्या रक्षक काळजीवरील स्थिर विश्वासाद्वारे सुरक्षितपणे झोपतो.
संध्याकाळची प्रार्थनाविश्वासशांतीआनंद
1हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका.
2अहो मनुष्यांनो, किती वेळा तुम्ही माझ्या गौरवाला काळिमा लावणार? किती काळ तुम्ही फसवणुकीवर प्रीती कराल आणि खोट्या दैवतांचा शोध कराल ? सेलाह
3हे लक्षात ठेवा, विश्वासू सेवकांस याहवेहने स्वतःसाठी निवडून बाजूला ठेवले आहे; मी जेव्हा त्यांचा धावा करेन, तेव्हा ते माझे ऐकतील.
4भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह
5त्यांना नीतियुक्त यज्ञार्पणे करा. आणि याहवेहवर विश्वास ठेवा.
6“आमचे कल्याण कोण करणार,” असे अनेकजण म्हणतात, हे याहवेह, तुमच्या चेहर्याचा प्रकाश आम्हावर पाडा.
7विपुल धान्य व द्राक्षारस देतो त्या आनंदापेक्षाही कितीतरी अधिक आनंद तुम्ही माझ्या हृदयात दिला आहे.
8मी शांतचित्ताने झोपी जाईन, कारण हे याहवेह तुम्हीच मला सुरक्षित ठेवता.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.