A grieving man confesses to an elder before joining musicians and neighbors in sunlight

स्तोत्रसंहिता 32

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 32 क्षमा केलेल्या चुकीच्या कृत्याच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो. लपवणे जीवन कमी करते, पण प्रामाणिक कबुली आनंद पुनर्स्थापित करते; क्षमा केलेली व्यक्ती नंतर शहाणी शिकवण मिळवते आणि आनंदी स्तुतीत सरळ समाजात सामील होते.
क्षमाकबुलीशिकवणआनंद
1धन्य तो मनुष्य, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे.
2धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशेबी याहवेह पापाचा दोष लावत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही.
3मी गप्प राहिलो, तेव्हा संपूर्ण दिवस माझी हाडे माझ्या कण्हण्यामुळे जर्जर झाली.
4रात्रंदिवस तुमचा हात माझ्यावर भारी होता; उष्मकालच्या उष्णतेप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली होती. सेला
5नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली आणि माझे अपराध लपविले नाही. मी स्वतःशी म्हणालो, “मी याहवेहजवळ माझी पातके कबूल करेन.” तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या दोषाची क्षमा केली. सेला
6यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याने तुम्हाला पावण्याची संधी आहे तोपर्यंत तुमची प्रार्थना करावी; संकटे जलाच्या महापूरासारखी आली तरी त्यांना त्याचा स्पर्श होणार नाही.
7माझे आश्रयस्थान तुम्ही आहात; संकटात तुम्हीच माझे रक्षण करणार आणि मुक्ततेच्या गीतांनी तुम्ही मला वेढणार. सेलाह
8याहवेह म्हणतात, जो मार्ग तू अनुसरावा त्याचे मी तुला मार्गदर्शन व शिक्षण देईन; माझी प्रेमळ नजर तुजवर ठेऊन मी तुला बोध करेन.
9तुमची मनोवृत्ती घोड्यासारखी किंवा खेचरासारखी नसावी, ज्यांना काही समज नसते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी अंकुश आणि लगाम लागतो, अन्यथा ते आपल्याजवळ येणार नाहीत.
10दुर्जनांवर अनेक दुःखे येतात. परंतु जे याहवेहवर विश्वास ठेवतात, त्यांच्याभोवती त्यांच्या अक्षयप्रीतीचे वेष्टण असते.
11नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद आणि हर्ष करा; तुम्ही जे सरळ मनाचे आहात, ते आनंदाने आरोळ्या मारा.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.