A shepherd leads sheep beside water, through a ravine, and toward an abundant table

स्तोत्रसंहिता 23

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 23 मेंढपाळाच्या लक्षपूर्वक काळजीखालील जीवन चित्रित करते: विश्रांती, पुनर्स्थापना, योग्य मार्ग, गहन सावलीत धैर्य, विपुल मेज, अभिषेक, आणि घरी चिरस्थायी स्वागत व आपलेपणाचे वचन.
मेंढपाळतरतूदरक्षणघर
1याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.
2ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात, ते मला संथपणे वाहणार्‍या झर्‍याजवळ नेतात.
3ते माझा जीव ताजातवाना करतात. ते आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितात.
4मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.
5तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढता; तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता; माझा प्याला भरभरून वाहत आहे.
6खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीती मजबरोबर आयुष्यभर असतील, आणि मी याहवेहच्या, घरात सदासर्वदा राहीन.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.