Job sitting at dusk beside extinguished lamps and broken tent cords

इय्योब 17

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
इय्योब म्हणतो की त्याचा आत्मा तुटला आहे, त्याचे दिवस संपले आहेत, आणि कबर त्याच्यासाठी तयार आहे. थट्टा करणाऱ्या लोकांनी आणि परीक्षेत अपयशी ठरलेल्या मित्रांनी घेरलेला, तो विचारतो की त्याच्यासाठी कोण प्रतिज्ञा देईल, आणि त्याची उरलेली एकमेव आशा अंधारातच शोधावी लागेल हे शोधतो.
निराशाथट्टाआशामृत्यू
1माझा आत्मा तुटून गेला आहे, माझ्या आयुष्याचे दिवस छाटले गेले आहे, कबर माझी वाट पाहत आहे.
2खचितच थट्टा करणारे मला घेरून घेतात; त्यांच्या वैरभावावर माझी नजर लागली आहे.
3“हे परमेश्वरा तुमच्या वचनानुसार माझ्याबरोबर करार करा. कारण मला जामीन आणखी कोण आहे?
4तुम्ही त्यांचे मन सुज्ञतेस वंचित केले आहे; म्हणून तुम्ही त्यांना विजयी होऊ देणार नाही.
5जे मोबदल्यासाठी आपल्या मित्रांचा घात करतात, त्यांच्या लेकरांचे डोळे अंध होतील.
6“परमेश्वराने मला सर्वांसाठी थट्टेचा विषय केले आहे, असा मनुष्य, ज्याच्या तोंडावर लोक थुंकतात.
7दुःखाने माझे डोळे अंधुक झाले आहेत; आणि माझे शरीर सावलीसारखे झाले आहे.
8यामुळे प्रामाणिक लोक भयप्रद झाले आहेत; निर्दोष लोक देवहीनांवर उठले आहेत.
9तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील, आणि शुद्ध हृदयाचे लोक अधिक बलवान होत जातील.
10“परंतु चला, तुम्ही सर्वजण पुन्हा प्रयत्न करा! तुमच्यात एकही बुद्धिमान मला सापडणार नाही.
11माझे दिवस निघून गेले आहेत, माझ्या योजना विखुरल्या आहेत. परंतु माझ्या हृदयाची आशा भंगली नाही.
12ते रात्रीला दिवसात बदलतात; आणि अंधारात असूनही दिवस जवळ आहे असे म्हणतात.
13ज्या घराची मी आशा धरतो, ती जर कबर आहे, अंधकाराच्या राज्यात जर मी माझे अंथरूण पसरेल,
14जर कुजण्याला, ‘तू माझा पिता आहेस’ असे म्हटले आणि किडण्याला, ‘माझी आई’ किंवा ‘माझी बहीण’ म्हणेन,
15तर मग माझी आशा कुठे आहे— आणि कोण माझ्यासाठी आशावादी असणार?
16ती अधोलोकाच्या द्वारात जाणार का? आम्ही दोघेही धुळीमध्ये एकत्रच जाणार का?”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.