An elder tracing family branches with cords and stones before many ancestral households

1 इतिहास 1

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
इतिवृत्त आदामापासून नोहा व त्याच्या मुलांपर्यंत मानवतेचा माग काढून सुरू होते, नंतर अब्राहामाच्या वंशजांना इश्माएल, इसहाक आणि एसाव यांच्याद्वारे अनुसरते. व्यापक वंशावळ इस्राएलला राष्ट्रांच्या व्यापक कुटुंबात स्थान देते.
वंशावळमूळराष्ट्रेसातत्य
1आदाम, शेथ, अनोश,
2केनान, महलालेल, यारेद,
3हनोख, मथुशेलह, लामेख, नोआह.
4नोआहाचे पुत्र: शेम, हाम व याफेथ.
5याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.
6गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.
7यावानाचे पुत्र: एलिशाह, तार्शीश, कित्तीम व रोदानीम.
8हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान.
9कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. रामाहचे पुत्र: शबा व ददान.
10कूश निम्रोदचा पिता होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला.
11इजिप्तचे पुत्र: लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
12पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम.
13कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन, आणि हेथ,
14यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
15हिव्वी, आर्की, सीनी,
16अर्वादी, समारी व हमाथी.
17शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.
18अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला, व शेलाह एबरचा पिता झाला.
19एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.
20योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
21हदोराम, ऊजाल, दिक्लाह,
22ओबाल , अबीमाएल, शबा,
23ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.
24शेम, अर्पक्षद, शेलाह,
25एबर, पेलेग, रऊ,
26सरूग, नाहोर, तेरह,
27व अब्राम (अर्थात् अब्राहाम).
28अब्राहामाचे पुत्र: इसहाक व इश्माएल.
29हे त्यांचे वंशज होते: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,
30मिश्मा, दूमाह, मस्सा, हदद, तेमा,
31यतूर, नापीश आणि केदमाह. हे इश्माएलचे पुत्र होते.
32अब्राहामाची उपपत्नी केटूराह हिला जन्मलेले पुत्र: जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह. योक्षानचे पुत्र: शबा आणि ददान.
33मिद्यानाचे पुत्र: एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह. हे सर्व केटूराहचे वंशज होते.
34अब्राहामास इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र: एसाव व इस्राएल.
35एसावाचे पुत्र: एलीफाज, रऊएल, यऊश, यालाम व कोरह.
36एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज, तिम्नाद्वारे: अमालेक.
37रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा.
38सेईराचे पुत्र: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह, दिशोन, एसर व दीशान.
39लोटानाचे पुत्र: होरी व होमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती.
40शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह.
41अनाहचा पुत्र: दिशोन. दिशोनाचे पुत्र: हेमदान , एश्बान, इथरान व करान.
42एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व याकान . दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान.
43इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: बौराचा पुत्र बेला; त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.
44बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.
45योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.
46हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.
47मग हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला.
48सामलाहच्या मृत्यूनंतर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातला शौल त्याच्या जागी राजा झाला.
49शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.
50बआल-हानानच्या मृत्यूनंतर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेदची कन्या होती.
51हदादही मरण पावला. एदोमाचे मूळ पुरुष: तिम्ना, आल्वा, यतेथ,
52ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,
53केनाज, तेमान, मिब्सार,
54मग्दीएल व ईराम. हे एदोम देशाचे मुख्य अधिकारी होते.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.